सहज सुचलेल काहीतरी !!!

Download Free Android Apps

Ads 728x90

Ads 728x90

recenlt Apps

सत्तेचे लाचारी !!!
20:19
सत्तेसाठी मारामारी हे आता नेहमीचेच चित्र
आपले नेते म्हणजे आपले पाठमोरे मित्र
फ़क्त आपला खिसा भरायचा हेच यांच्या अंतरी
आपणच निवडलेले हे आपलेच मंत्री !!!

खडयांतील रस्ते ही तर यांची शान
त्यावरून चालताना सामान्यच हरवतो ओ भान
भाषणांचे उंच मनोरे यांचे सर्वत्री
कितीही ओरडले तरी हे एकाच माळेचे मंत्री !!!

सगाळिकडे झालीय दुर्दशा आज
सत्तेचाच झालाय या सर्वांना माज
कोणी तरी सांगा याना माणुसकिची नाती
कधी तरी घ्या सामान्यांचा हात आपला हाती !!!
-कल्पेश 😇


आठवण तुझी !!!
20:13
आठवण तुझी आली की
मला स्वतः चाच विसर पडतो
तू जवळ असती तर..
या स्वन्पांचा मोह मलाच पडतो..!!!

माहीत नाही का पण
तुझ्याशी खुप काही बोलण्याची इच्छा होते
पण काय करू ग क्षणात
शब्दांची दिशाच हरवून जाते..!!!

पावसाची प्रत्येक सर
तुज्या स्पर्शाचा गारवा देऊन जाते..
तू आता खुप दूर गेलियस
ही आठवण मला पुन्हा भानावर आणून जाते !!!
-कल्पेश 😇


डोळ्यांतील गुंतागुंत
20:05
तुझ्या डोळ्यांतली गुंतागुंत
आता कशी तुलाच सांगू
तुझ्या या नजरेतील हेे विश्व
माझ्या मोजक्या शब्दांत कस गं मांडू !!!

तुझ्या नजरेला नजर देण्याची हिम्मत
मी कधीच केली नाही
तरी सुद्धा तुझ्या नजरेचं कोडं
स्वस्थ बसुच देतं नाही..!!!

तूझ्यावर काही लिहायला गेलो
की माझेच शब्द मला अड़वतात
आज वाटतं तुझे नयनच
ही शब्दांची जुळवाजुळव घडवतात...!!!
-कल्पेश 😇
किरण

Ads 728x90

Contact Us